मित्र हो, चित्रविचित्र वर्तमान काळ तुमच्यासमोर आहे. तो समजून घेतल्याशिवाय तुम्हाला नवीन, भरीव असं काही करता येईल, असं मला वाटत नाही!
ज्या लेखकाला उत्तम काही लिहायचं असेल, नवं काही निर्माण करायचं असेल, त्याला त्याच्या परंपरेचं भान असायलाच हवं. कारण कोणताही लेखक आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभा असतो. म्हणून त्याला खूप दूरचं दिसतं. पण ज्याला आधीच्या परंपरेकडंच गंभीरपणे जाण्याचा कंटाळा आहे, किंवा ‘मीच फक्त या भूमीत उगवलेला आहे’ अशा प्रकारचा ज्याचा समज आहे, त्याच्या लेखनाला मर्यादा पडणं क्रमप्राप्त आहे.......